January 31, 2025 10:09 am

इंदापुरातील दीन दलितांचा, गोरगरिबांचा मसीहा युवराज मामा पोळ हे काळाच्या पडद्याआड.

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापुरातील दीन दलितांचा, गोरगरिबांचा मसीहा युवराज मामा पोळ हे काळाच्या पडद्याआड.

पिंपरी बुद्रुक
दिनांक -21/12/2024
प्रतिनिधी: समाधान रजपूत.

इंदापूर तालुक्यामध्ये सामाजिक कार्य करणारे युवराज मामा पोळ यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युवराज मामा पोळ यांच्या निधनाने इंदापूर तालुका हा पोरका झालेला आहे. समाजातील शोषित , दीन दलित गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी अहोरात्र केले.
भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्यात मध्ये जवळजवळ 80 हून अधिक शाखांचे उद्घाटन केले होते. सर्व लोकांना मानसन्मान देणे त्याचप्रमाणे लोकांची इज्जत करणे आणि स्वाभिमानाने राहणे या अशा गोष्टी फक्त आणि फक्त युवराज मामा पोळ यांच्याकडेच होत्या.
युवराज मामा पोळ यांच्या अचानक जाण्याने इंदापूर तालुक्यातील जनता ही खूप हळहळ व्यक्त करत आहे. युवराज मामा हे हक्काचे माणूस त्याचप्रमाणे दिलदार आणि राजा माणूस होता अशा या दिलदार आणि राजा माणसाला इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेकडून भावपूर्ण श्रद्धांजली. इंदापूर तालुक्यातील गोरगरीब दीनदलित जनता ही युवराज मामा पोळ यांना कधीही विसरणार नाही.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!