अमळनेर येथे एच.आय.व्ही. एड्स जनजागृती निमित्त रांगोळी व पोस्टर स्पर्धा संपन्न…

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथे एच.आय.व्ही. एड्स जनजागृती निमित्त रांगोळी व पोस्टर स्पर्धा संपन्न…

 

अमळनेर : विक्की जाधव 

1 ते 15 डिसेंबर या दरम्यान मानवी हक्काचा,सन्मानाचा या उद्देशाला धरून जागतिक एड्स पंधरवाडा निमित्ताने अमळनेर ग्रामीण रुग्णालय, आय.सी.टी.सी.विभाग,ए. आर.टी.विभाग, रोटरी क्लब व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने, अमळनेर शहरात वय वर्ष अठरा च्या वर सर्वासाठी खुल्या रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.त्यावेळी दोन्ही स्पर्धेत पन्नासच्या वर स्पर्धक सहभागी होते. परीक्षक म्हणून करुणा क्लबचे जिल्हा सचिव डी. एन .पालवे हे होते.प्रमुख पाहुणे डॉ.जी.एम.पाटील, डॉ.पी.के.ताडे, डॉ.प्रशांत शिंदे,डॉ. शरद बाविस्कर,डॉ. सुमित पाटील, डॉ.राजेंद्र ठाकरे,रोटरी क्लबचे प्रतीक जैन,देवेंद्र कोठारी,उदय कुमार खैरनार, किशोर सूर्यवंशी, अमोल शाह,संजय मुसळे, शरद शेवाळे, समाजकार्य महाविद्यालय डॉ.अनिता खेडकर, प्रा. विजयकुमार वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग लाभला.जनजागृती मोहिमेअंतर्गत स्पर्धेचे आयोजन ग्रामीण रुग्णालय येथील समुपदेशक अश्वमेध पाटील, दीपक शेलार, जयेश मोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे, छाया सरपे, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष डॉ.भारती पाटील,

कार्यकारी संचालक रेणु प्रसाद ,राकेश महाजन, अश्विनी सूर्यवंशी, कल्पना सूर्यवंशी, मुरलीधर बिरारी

व संस्थे अंतर्गत असणाऱ्या संपूर्ण टीचे सहकार्य लाभले. सर्व स्पर्धकांना रोटरी क्लब अमळनेर तर्फे बक्षीस देण्यात आले तर सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आली.

यांना मिळाले बक्षीस

रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक प्रियंका परदेशी,द्वितीय क्रमांक मयुरी बारी,तृतीय क्रमांक स्नेहल पाटील,उत्तेजनार्थ प्रेरणा लिंगायत पोस्टर स्पर्धा प्रथम क्रमांक ज्योती भोई,द्वितीय क्रमांक सोनू तेजी,तृतीय क्रमांक आशा जाधव

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!