“सकल हिंदू समाजातर्फे मानवधिकार दिनी बांगलादेशात सुरु असलेल्या हिंदूंवरील क्रूर जिहादी अत्याचारविरोधात न्याय यात्रा”
अमळनेर : विक्की जाधव
धर्माच्या आधारावर बांगलादेशात सुरु असलेल्या हिंदूंवरील क्रूर जिहादी अत्याचारविरोधात दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 3 वाजता न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बांगलादेशात हिंदू मंदिराची जाळपोळ, तोडफोड, चोऱ्या, हिंदू महिलांवरील क्रूर अत्याचार, हिंदूंना होणारी अमानुष मारहाण तसेच हिंदूंची सर्वप्रकारे लूट या सारख्या क्रूर अत्याचाराच्या प्रचंड चीड आणणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना बांगलादेशातून रोज नव्याने समोर येत आहेत. बांगलादेशातील हिंदूंचा मानवधिकार संपूर्णपणे हिरावून व हिसकावून घेतला आहे. या घटनांचे गांभीर्य आणि वेदना जगात पोहोचविण्यासाठी, दुष्कृत्यांचा निषेध कण्यासाठी या न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू समाजातील सर्व लोकांनी, विविध घटकांनी, सार्वजनिक मंडळानी, संस्थानी व बांगलादेशातील हिंदू अत्याचारविरोधात निषेध करू वाटणाऱ्या सर्वांनीच दि. 10/12/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 3 वाजता जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन निषेध नोंदविण्यासाठी व मा. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.