तेजज्ञान फाउंडेशनच्या ध्यान महोत्सवाची उत्साहात सांगता..
अमळनेर : विक्की जाधव
‘हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमळनेर येथे ‘रजत जयंती ध्यान महोत्सव सोहोळा’ (सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात तेजज्ञान फाउंडेशनच्या सुधाकर माळी यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून देत केली. त्यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे, असे समजावले. जीवनात ‘स्वल्पविराम’ घेण्याचे महत्व पटवून देत, “हातातील मोबाइल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास, ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा, ‘स्व-अनुभव’ होईल,” असे ते म्हणाले. कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. “मी कोण आहे?” हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, ज्यातून उपस्थितांना ‘स्व-अनुभव’ मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किरण कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाच्या सेवेसाठी ,सरला जगदाळे, चंद्रकांत जगदाळे, गुलाब महाजन ,ओंकार चव्हाण, समाधान पारधी ,प्रवीण डंबेलकर, दिलीप पाटील, सीमा सासनार्णी विशाल चौधरी, अशोक सासनार्णी,धर्मेंद्र सासनार्णी,आर .बी .पाटील ,रेखा कुलकर्णी ,सुलभा पाटील ,इच्छानंद, दिलीप बडगुजर