बारामती विधानसभा मतदार संघामध्ये अजितदादा 1,16,820 मतांनी विजयी झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन💐
– हर्षदा झगडे, बारामती..
मार्मिक समाचार न्यूज, बारामती
संदिप आढाव – 9697009199
बारामती मतदार संघामध्ये या वेळेस ही लढत खुप चुरशीची होती कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संपुर्ण पवार फॅमिली अजितदादाच्या विरोधात उभी होती. बारामतीच्या कोणत्याही निवडणुकीत साहेबांच्या धर्मपत्नी प्रतिभा काकींना प्रचार करताना आम्ही कधी पाहिले नाही किंवा तसे ऐकण्यात नाही. परंतु लोकसभा व आता विधानसभेला प्रतिभा काकींनाही दादांच्या विरोधात प्रचार करताना पाहिले. पवार कुटूंबातील ईतर महिला ही दादांच्या विरोधात प्रचार करताना दिसून आल्या म्हणजे संपुर्ण कुटूंबाने दादाला एकटे पाडले होते. परंतु बारामतीची जनता सुज्ञ आहे. संपुर्ण बारामतीची जनता दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. कारण सगळ्यांना माहिती आहे. दादा कामाचा मानुस आहे. दादांना अहोरात्र मेहनत घेताना बारामतीकरांनी पाहिले आहे. बारामतीचा विकास करायचा असेल तर दादाशिवाय पर्याय नाही असे सर्वांना माहित आहे. म्हणूनच विधानसभेला मतांचे भरभरून दान बारामतीकरांनी दादांच्या झोळीत टाकले आहे. त्यांच्या ऋणातून कसे मुक्त होवू ईतका आनंद आज दादांना वाटला असेल आणी बारामतीकरांचा अभिमान आणि गर्वही वाटला असेल.
कारण दादा एकटे पडले होते. बाहेरचा कितीही विरोध असला तरी प्रत्येक मानुस दोन हात करतो पण इथे घरातल्याच लोकांशी दोन हात करायचे म्हणजे खुप अवघड असते. परंतु बारामतीच्या जनतेने दादांना एकटे पडू दिले नाही. आणी खंबीरपणे दादांच्या पाठीमागे उभी राहिली. त्यामुळे दादांचा विजय झाला आणी खरया अर्थाने संपुर्ण बारामतीकरांचा हा विजय मानावा लागेल. सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. सर्व महायुती व महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व पुढिल राजकिय वाटचाली साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..💐
हर्षदा राहुल झगडे
बारामती, जि. पुणे
.