November 21, 2024 7:44 pm

“अमळनेर ची जनता सुज्ञ आहे” अमळनेर ची जनता सुज्ञ आहे, ती शाश्वत विकासाच्या नावाच्या भुलथापान बळी पडणार नाही. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

“अमळनेर ची जनता सुज्ञ आहे” अमळनेर ची जनता सुज्ञ आहे, ती शाश्वत विकासाच्या नावाच्या भुलथापान बळी पडणार नाही. 

 

अमळनेर : विक्की जाधव

अमळनेर तालुक्यात कोविड काळात खूप भयानक परिस्थिती होती,  जेव्हा कोणीच कोणाचे नाही तेव्हा माणूसच माणसाचा आधार होता. जनतेच्या पैशावर उन्माद करणारे मंत्री एकेकाळी झोळ्या घेऊन तालुक्यात फिरून जनतेची दिशाभूल करून भूमिपुत्र -भूमिपुत्र म्हणून घेणारे मंत्र्यांनी आपल्या स्वतःच्या झोळ्यात भरल्या ज्यावेळी संपूर्ण तालुक्याला नेत्यांचा आधार हवा होता. जेव्हा रुग्णांना ऑक्सिजन, औषधे, आणि अन्नाची गरज होती, तेव्हा भूमिपुत्र कोठे होता असा प्रश्न निर्माण होतो.

यावेळी तेच माजी आमदार शिरीष चौधरी, रवींद्र बापू चौधरी आणि कार्यकर्ते लोकांसाठी रस्त्यावर उतरले, त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. मात्र, अनिल पाटील? ते मात्र गायबच होते.

जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या अनिल पाटील यांनी त्यांच्या सत्तेचा आणि अधिकाराचा उपयोग कोविड काळात जनतेच्या हितासाठी कधी केला? कुठे होते ते, जेव्हा रुग्णालयात जागा नव्हती, ऑक्सिजनचा तुटवडा होता, आणि कुटुंबं आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी धडपडत होती?

माजी आमदारांनी अमळनेर मतदारसंघात रुग्णांसाठी मदत पुरवली, अन्नसामग्री वाटली, आणि संकटात लोकांसोबत राहिले. मग सत्तेत असलेले अनिल पाटील कुठे होते?? हा प्रश्न आता जनतेने विचारायची वेळ आली आहे.
कोविड काळातील अनिल पाटील यांच्या उदासीनतेमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली. अशा नेत्याला पुन्हा मत देऊन आपण आपल्या भविष्याला धोका देणार आहोत का?

20 नोव्हेंबरच्या निवडणुकीत जनतेने याची जाणीव ठेवावी की, कोविडसारख्या संकटात ज्यांनी सोबत सोडली, ते सत्ता मिळाल्यावर जनतेचे प्रश्न कसे सोडवणार?

अनिल पाटील यांनी कोविड काळातील त्यांच्या उदासीनतेबद्दल स्पष्टीकरण दिले पाहिजे. तालुक्यातील जनतेने विचारले पाहिजे संकटाच्या काळात कुठे होता ? भूमिपुत्र. भूमिपुत्र कुठे होता तुझा भूमिपुत्र???

मतदारांनी सजग राहून कोविड काळातील नेत्यांच्या कर्तृत्वाची आणि त्याच्या प्रतिकूल वर्तनाची नोंद घेऊन योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. चला, विचारपूर्वक मतदान करून समाजाचा खरा नेता निवडूया!
क्रमश :

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!