भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी धुळे भाजपा जिल्हा चिटणीसपदी रोहिदास पाटील यांची केली नियुक्ती
धुळे भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीसपदी रोहिदास गंगाराम पाटील रा. मुकटी ता. धुळे जि. धुळे यांची नियुक्ती धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली आहे. रोहिदास पाटील यांना बबनराव चौधरी यांचा हस्ते मुकटी येथे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. नियुक्तीपत्र देतेवेळी धुळे ग्रामिण विधान सभा प्रवाशी नेता कनक बरोट, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी तसेच मुकटी येथील बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आदि मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. रोहिदास पाटील हे मुकटी ग्रामपंचायतचे सरपंच तसेच पंचायत समिती सदस्य होते. त्यांना बबनराव चौधरी यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. की, आपण सामाजिक व विविध क्षेत्रात काम करीत आहात. त्याची दखल घेवून आपली ही नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा उपयोग पक्षवाढीसाठी निश्चितपणे होईल. आपण ही जबाबदारी सर्वाना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल, असा मला विश्वास आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन व आपल्या आगामी कार्यास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा असे नमुद केले आहे. रोहिदास पाटील यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपा धुळे जिल्हा प्रसिद्धी व मीडिया प्रमुख जितेंद्र जैन बंब यांनी दिली.