माळेगाव परिसरामध्ये रोड रोमियोगिरी करणाऱ्या व अल्पवयीन दुचाकी चालकांवर कार्यवाही…
बारामती ( सह-संपादक- संदिप आढाव)
.
माळेगांव व परिसरात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.विशेषत:निरा- बारामती या राज्य मार्गावर सातत्याने जिवघेणे अपघात होत आहेत.तर शहरातील अनेक शाळा परिसरात अल्पवयीन चालक व रोड रोमिओ यांची टगेगिरी अधिक वाढली आहे.यामुळे अशा वहान चालकांवर माळेगांव पोलिस ठाण्याच्या वहातुक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
इंग्लिश मिडीयम स्कूल, शिवनगर येथील शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ, अभियांत्रिकी महाविद्यालय व निरा – बारामती या राज्य मार्गावर वहान परवाना नसणे,वहानाची कागदपत्रे नसणे, फॅन्सी नंबर,वहानांना नंबर नसणे, प्रदुषण परवाना, कर्कश हॉर्न वाजविणे, मद्यपान करून वाहन चालविणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वहातुक शाखेचे काका पाटोळे, संदीप वाघमोडे, धनंजय दडस, गणेश खंडागळे, होमगार्ड रोहित भोसले यांनी केली….