करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहरातील भवानी पेठ, कुंभारवाडा येथे करमाळा तालुका सकल कुंभार समाजबांधवांच्या वतीने श्री. संत शिरोमणी गोरोबाकाका व श्री. विठ्ठल रूक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच कळसारोहण सोहळा सोमवार दि. 21 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष बाळनाथ कुंभार यांनी दिली आहे.
रविवार, दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री.संत शिरोमणी गोरोबाकाका व श्री. विठ्ठल रूक्मिणी मूर्तीची मिरवणूक शहरामधून काढयात येणार आहे. सायंकाळी 06.00 वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर घोडके महाराज (लोणार टाकळी) यांचे प्रवचन होणार आहे. सायंकाळी 07.00 ते 08.00 वाजेपर्यंत हरिपाठ व रात्री 09.00 ते 11.00 यावेळेत ह.भ.प. गोरक्ष महाराज कुंभार (फलटण) यांचे किर्तन होणार आहे. तसेच दि.21 ऑक्टोबर 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण होणार असून सकाळी 06.00 ते 10.30 वाजेपर्यंत होमहवन होणार असून भाविकांनी सदरच्या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सकल कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.