भिगवन परिसरात तब्बल 16 कोटी 26 लाख रुपये कामाचा उद्घाटन भूमिपूजन समारंभ दत्तात्रय भरणे याच्या हस्ते पार पडणार
(निलेश गायकवाड)
माजी मंत्री तथा इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भिगवन व भिगवन स्टेशन येथील विविध 16 कोटी 26 लाख रुपये कामाचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ शुक्रवार 11/10/2024 रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे.
भरणे यांनी यापूर्वी देखील परिसरामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ केले आहे . माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामावर देखील जनतेने आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील भरणे यांनी राहिलेले विकास कामे पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.