करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आमची मते जाणून घेऊन उमेदवार जाहीर करावा अन्यथा वेगळी भूमिका घेऊन पक्षाने दिलेला उमेदवार पाडू असे मत हनुमंत मांढरे- पाटील यांनी व्यक्त केले आहे सन २०१९ विधानसभेच्या काळात पक्षा सोबत कोण होते अपक्ष उमेदवाराला पक्षाने पाठींबा दिल्या नंतर पक्ष आदेश पाळून कोणी प्रामाणिक पणे काम केल होत आजची निष्ठेचा आव आणून मिरवणारी सन२०१९ ला कोणाची चाटूगिरी करत होती सर्व अहवाल वस्तुस्थिती पक्ष क्षेष्ठींनी जिल्हा अध्यक्ष यांच्या कडून जाणून घ्यावा व खरोखरंच जे निष्ठावंत आहेत त्यांना विश्वासात घेऊन मते जाणून घेऊन उमेदवारी जाहीर करावी सन २०१९ विधानसभा काळात बागल गटाने पक्ष सोडल्या वर पक्षाला मोठं खिंडार पडले होते माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्तानी पक्षाची धुरा सांभाळत तालुकाध्यक्ष पदावरती काम करत आसताना अपक्ष उमेदवाराला पक्षाने पाठींबा दिल्या नंतर प्रमाणिक पणे त्यांचे काम करून त्यांना निवडून आणलं होत आज देखील आपण पक्षाचे प्रमाणिक पणे काम करत आहे तालुक्यातील गोरगरीब सर्व सामान्य लोकांची कामं करत आहे आसे आसताना पक्षाने आमच्या सारख्या अनेक पदाधिकारी यांना विश्वासात न घेता उमेदवार दिल्यास तालुक्यातील अपक्ष उमेदवाराचा प्रचार करून पक्षाचा उमेदवार पाडू आसे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे- पाटील यांनी व्यक्त केले आहे त्या वेळी जिल्हा उप अध्यक्ष सरपंच गौरव झांजूर्णे शहर अध्यक्ष शिवराज जगताप उपाध्यक्ष केतन इंदूरे भारत झांजूर्णे राजू शेख प्रकाश कांबळे नामदेव कांबळे सचिन माने देवा पवार विजय जाधव सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते