मुलीने दिलेल्या अवयव दानाने वडिलांना मिळाले जिवदान साक्षी रामराव शेळके हिच्या धाडसाने सगळ्यांची मने जिंकली सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे येथील डॉ.बिपीन विभुते यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
(प्रतिनिधी – मयुर जाधव)
मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे येथील तंटामुक्ती गाव समितीचे पहिले अध्यक्ष आणि मलठण गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व रामराव बबनराव शेळके यांचे यकृत खराब झाले होते, अनेक तपासणीनंतर यकृताचा काही भाग नवीन टाकावा लागणार होता, आपली लाडकी असलेली कन्या साक्षी रामराव शेळके हिने आपल्या स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करण्याचे तिने ठरवले, डॉक्टर बिपिन विभुते यांनी त्यांच्या नातेवाईकांबरोबर आणि स्वतः साक्षी बरोबर चर्चा केल्यानंतर, साक्षी रामराव शेळके हिने आपले स्वतःचे यकृत दान करण्याचा निर्णय घेतला, तीन महिन्याच्या तपासणीनंतर अनेक चाचण्या करण्यात आल्या ,आणि गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 म्हणजेच घटस्थापने दिवशी सकाळी सात वाजता सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन पुणे येथे यकृत दानाची यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न झाली, सुमारे दहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर दोन्ही पेशंट व्यवस्थित सुखरूप आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची आनंदाची बातमी त्यांनी त्यांच्या उपस्थित नातेवाईकांना सांगितली, नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनसा झाला होता, आनंद अस्श्रुने नातेवाईकांचा बांध फुटला होता, यकृत बदलने हे नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो, यकृत खराब झाले नंतर जगण्याचा मार्ग कमी जास्त कठीण झालेला असतो, अशा या कठीण परिस्थितीत त्यांची कन्या साक्षी रामराव शेळके हिने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक करायला शब्द च नाहीत, मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे येथील नावाजलेल्या कुटुंबा पैकी हे एक शेळके कुटुंब आहे, सगळे काही आलबेल चालु असताना वकिली पदवी मिळवलेले रामराव बबनराव शेळके हे गेले अकरा महिन्यापासून यकृताच्या आजाराने आजारी होते ,हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना डॉक्टर बीपीन विभुते यांनी त्यांचे यकृत बदलण्याचा निर्णय घेतला होता, काहीही करुन मी माझेच यकृत दान करनार असलेचे साक्षी रामराव शेळके हिने स्पष्ट सांगितले, आणि डॉ. बिपिन विभुते यांनी सुद्धा तिला होकार दिला, अनेक चाचण्या केले नंतर यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न झाली,आज दोन्ही पेशंट सुखरुप आणि सुरक्षित आहेत,सध्या साक्षी रामराव शेळके ही घरी येऊन विश्रांती घेत आहे, तर रामराव बबनराव शेळके हे सध्या हॉस्पिटलमध्ये च उपचार घेत असुन त्यांना सुद्धा लवकर घरी सोडण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे, यकृताच्या गंभीर आजारावर मात करीत आज पुन्हा नव्या जोमाने जीवन जगण्याचा राम राव बबनराव शेळके यांचा मार्ग मोकळा झालेला आहे, ते पुन्हा नव्या जोमाने ,आपला संसार ,आपला प्रपंच ,आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवतील यात अजिबात शंका नाही ,आणि त्याचा अभिमान त्यांच्या नातेवाईकांना ,गावकऱ्यांना, त्यांच्या सर्व मित्र परिवारांना वाटतो आहे,पण या यशस्वी पित्याला आपली लाडकी कन्या साक्षी रामराव शेळके हिचे योगदान खुप मोलाचे आहे, आणि तिचे कार्य खुप अनमोल, कौतुकास्पद,प्रेरणादायी आणि विचार करनारे नक्कीच आहे, आणि म्हणून तिच्या या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.