January 30, 2025 10:38 am

इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून दरडग्रस्त ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेट देऊन पाहणी केली तर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची गैरहजेरी 

अपनी भाषा में पढ़े! Translate

इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून दरडग्रस्त ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली तर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची गैरहजेरी 

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव

इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणी कामाचा आढावा घेतला. दुर्घटना झाल्या ठिकाणी पावसात छत्री घेऊन फोटो काढणारे मंत्री अनिल पाटील हे सद्द्या तरी कोणत्याही आपत्तीची व्यवस्थापन करताना दिसत नसून येत्या विधानसभेत मंत्री  अनिल पाटील यांचे तरी आपत्तीचे व्यवस्थापन होणार का असा सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे.

 

येत्या काही दिवसात या घराचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

इर्शाळवाडी येथे  मदत आणि पुनर्ववसन आपत्तीपन व्यवस्थापन विभागाचे मंत्री अनिल पाटील यांनी गैरजेरी मारली असून त्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. कर्तव्याचे तंतोतंत जाण असणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे जनसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अहो रात्र धडपड करत असून त्यांच्याच कार्यकारी मंडळातील आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी इर्शाळवाडी  येथे न जने म्हणजे जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याची आपली धडपड नाहीच असे दिसून येते. यावेळी पुणे येथून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी इर्शाळवाडी पुनर्वसन कामाला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, सिडको अधिकारी गणेश देशमुख यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जुलै 2023 साली खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली होती. अनेकजण मृत्यू पावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी  भेट देऊन तात्काळ पुनर्वसन करण्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते. जवळपास वर्षभरापासून सिडकोच्या माध्यमातून चालू असलेले बांधकाम पूर्ण झाले असून येथे 44 घरांची बांधणी करण्यात आली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!