इंदापूर येथे होणार भव्य परिवर्तन मेळावा;प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे,भरत शहा यांच्या उपस्थित निर्धार मेळाव्याचे आयोजन
तिसऱ्या आघाडीकडे होणार वाटचाल..
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील पुन्हा एकदा मार्केट कमिटी मैदान गाजणार असणारे चित्र पाहायला मिळणार आहे. म्हणजेच इंदापूर तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी व कार्यकर्ते यांच्यासाठी हे शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता इंदापूर येथील मार्केट कमिटी मैदान पोलीस स्टेशन समोर भव्य परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवीण माने , आप्पासाहेब जगदाळे , भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येणारे काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची मोट बांधली जाणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. सध्या इंदापूर तालुक्यातील झालेल्या या राजकीय घडामोडींवर विविध कार्यकर्ते व नागरिकांची गळचेपी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती अशी झाली आहे.
त्यामुळे आता सर्वाना तिसरा पर्याय मिळेल अशी अशा लागून राहिली आहे.
या निर्धार परिवर्तन मेळाव्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.