BKP मराठी पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांची निवड.

अपनी भाषा में पढ़े! Translate

BKP मराठी पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांची निवड.

पिंपरी बुद्रुक :
दिनांक-08,/102024
प्रतिनिधी: समाधान रजपूत.

इंदापूर येथे झालेल्या बैठकीमध्ये बीकेपी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव दादा कडाळे पाटील यांनी इंदापूर तालुका अध्यक्ष या पदासाठी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांची निवड केली. या निवडीच्या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातून आणि सोलापूर जिल्ह्यातून आलेले पत्रकार उपस्थित होते.
बीकेपी मराठी पत्रकार संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, उपाध्यक्षपदी सतीश जगताप ,सचिव पदी शंकर बोडके तसेच कार्याध्यक्षपदी ऋषिकेश दळवी यांच्या निवडी करण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी बीकेपी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव दादा कडाळे पाटील ,शंकर बोडके, सलीम शेख, सतीश जगताप, धनंजय शेंडगे, अशोक घोडके. बाळासाहेब ओहोळ, सदानंद बनसोडे, ऋषिकेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
बीकेपी मराठी पत्रकार संघाच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, हार, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!