June 30, 2025 11:55 pm

श्री. गिरधरदास देवी विद्यालय, करमाळा चे क्रीडा शिक्षक श्री. जितेंद्र कुंडलिक शिंदे यांना आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार प्रदान

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा-विठ्ठलराव शिंदे सांस्कृतिक मंडळ निमगाव (टे) ता.माढा, जि. सोलापूर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार येथील श्री. गिरधरदास देवी विद्यालय, करमाळा चे क्रीडा शिक्षक श्री. जितेंद्र कुंडलिक शिंदे यांना माननीय आमदार श्री. संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. जितेंद्र शिंदे यांनी श्री गिरधरदास देवी विद्यालयातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शन करीत जिल्हा स्तर तसेच राज्य स्तरावरावर दैदीप्यमान कामगिरी करीत असल्याने त्यांना सदरचा पुरस्कार देण्यात आला आहे.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्री. सचिन जगताप साहेब मा. श्री.गणेश भाऊ करे पाटील यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा ह. भ. प. सामाजिक कार्यकर्ते व मा. श्री. महेंद्र कदम सर, प्राचार्य श्री.विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी, श्री. गिरधरदास देवी विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. कन्हैयालाल देवी, सचिव श्री. अमोद शेठ संचिती संचालिका सौ. सुनीताभाभी देवी, संचालक श्री. विजयकुमार दोशी, श्री. चंद्रकांत देवी, मुख्याध्यापक श्री. संभाजी जगताप सर प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!