मंत्री अनिल पाटील यांना आमचा जाहीर पाठिंबा नाही. माळी समाजाने देखील पत्र काढून केला जाहीर खुलासा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मंत्री अनिल पाटील यांना आमचा जाहीर पाठिंबा नाही. माळी (महाजन ) समाजाने देखील पत्र काढून केला जाहीर खुलासा..

 

अमळनेर विकी जाधव 

अवघ्या दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असून “जणू मीच पुन्हा आमदार होणार”. असे स्वप्न आमदार. मंत्री अनिल पाटील यांना पडू लागले आहे. आपण लोकशाहीत आहोत. असा त्यांना विसर पडला असेल का?

निव्वळ पैशाच्या जोरावर विकत घेऊ अशी मानसिकता ठेवून निवडणूक लढवणार असाल तर खबरदार महोदय विधानसभेच्या मैदानात आपण चित_पट_व्हाल..

शाश्वत विकासाच्या नावावर टक्केवारी चालवून स्वतः लाभार्थी व्हायचे, आणि तालुक्यात विकासाच्या नावावर मोठमोठी भाषण ठोकायचे ?? हे आता सामान्य जनता खपवून घेणार नाही.

माळी समाजाने आपले लेटरहेड केले जाहीर…

माळी समाजाने आमचा कोणत्याही राजकीय व्यक्तीला जाहीर पाठिंबा नाही अशा आशयाचे समाजाचा लेटर हेडवर प्रसिद्ध करून जणू राजकीय पुढारी यांची गोची केली. माळी समाज हा कष्टकरी आणि स्वाभिमानी समाज असून कोणते राजकीय पुढाऱ्याने माळी समाजाला विकत घेण्याची भाषा करू नये पैशाच्या जोरावर समाजास विकत घेण्याची मानसिकता दाखवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना येता विधानसभेत त्यांची चांगली जागा प्रत्येक समाज बांधव दाखवल्याशिवाय राहणार नाही.

 

 

माळी समाज हा स्वाभिमानी आणि कष्ट करून जीवन जगणारा समाज असून माळी समाज मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा देणार नाही. आमची अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उठ सुठ काही ही बावड्या वाजवत खोट्या बातम्या प्रसिद्ध करायच्या आणि समाजात मतभेद निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची हे खरे खुरे राजकारण आहे का हे जनसामान्य मतदाराला कडून चुकले आहे. एवढेच नव्हे तर मंत्री अनिल पाटील यांना येत्या विधानसभेत आपण निवडून येणार का या संदर्भात देखील शाश्वती नाही म्हणूनच ते असले कामे करत असावेत असावे असा सवाल हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र बाबू चौधरी यांनी केला आहे.

नुकतीच अमळनेर तालुक्यात माळी समाजाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा. मिळाला. अश्या आशयाच्या बातम्या अमळनेर शहरात अन् तालुक्यात फिरू लागल्या असून मंत्री अनिल पाटील हे समाजासमाजात दोन गट निर्माण करून सोड बुद्धीचे राजकारण निर्माण करत आहे.

माळी समाजाच्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की आशी कोणत्याही प्रकारची आमची बैठक झालेली नाही. समाजाच्या वरिष्ठांची कोणताही प्रकारचा संपर्क केला नसून परस्पर मंत्री अनिल पाटील यांना पाठिंबा कोणी दिला. ? हा ही प्रश्न आहे. माळी समाजाने मंत्री अनिल पाटील यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबात दिलेला नाही. असे

माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

 

 

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!