पुढील तारीख मिळाल्याने उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना तूर्तास तरी दिलासा..
अमळनेर : विक्की जाधव.
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मुदतपूर्व बदलीला मॅट कोर्टाने पुढील तारीख दिल्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोर्टाच्या या आदेशाने उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. आपल्या कर्तुत्वाचा जोरावर आणि शासन प्रशासन यांचा समतोल राखत जनसामान्यांना न्याय देणाऱ्या अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांची अमळनेरात एक अनोखी ओळख निर्माण झाले आहे.
गेल्या एक ते दीड वर्षात खेडकर यांच्या कामासंधर्भात कोणतीही तक्रारी नसताना आणि त्यांचा दोन वर्षांचा प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना शासनाने त्यांची तडका फडकी बदली धुळे येथे केली असून धुळ्याचे नितीन मंडावरे यांची अमळनेर येथे बदली केली होती.
या बदलीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करून आश्चर्यही व्यक्त केले होते. या निर्णयाविरुद्ध महादेव खेडकर यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. तर खेडकर यांना स्थगिती मिळू नये म्हणून कॅव्हेट दाखल करण्यात आले होते. न्या व्ही के जाधव यांनी या निर्णयाला पुढील तारीख दिली असून तूर्तास तरी खेडकर यांना दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.