June 29, 2025 8:01 am

अमळनेर येथे शारदीय व्याख्यानमालेला मोठ्या उत्सवात सुरुवात..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथे शारदीय व्याख्यानमालेला मोठ्या उत्सवात सुरुवात..

 

अमळनेर : विक्की जाधव.

मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर, प्रा.आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय,अमळनेरतर्फे दि.3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मा.स्मिता उदय वाघ,खासदार जळगाव,यांच्या हस्ते शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले काल दि. 3.ऑक्टोबर रोजी श्री.उदय निरगुडकर, मुंबई यांनी भारत काल आज आणि उद्या या विषयावर पाहिले पुष्प गुंफले.

आज दि. 4.ऑक्टोबर रोजी ॲड.श्री.आशिषजी जाधव.  छ.संभाजी नगर यांचे भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर ते दुसरे पुष्प गुंफतील. दि. 5 ऑक्टोबर

रोजी शाहीर शिवाजीराव पाटील, नवरदेवळा यांचे रंग शाहिरी कलेचा या विषयावर ते तिसरे पुष्प गुंफतील. दि. 6 ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ.संजय कळमकर,अहिल्यानगर यांचे जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर ते चौथे पुष्प गुंफतील.डॉ.संदिप जोशी व

डॉ.मयुरी जोशी प्रमुख अतिथी असतील. तर दि. 7.ऑक्टोबर रोजी

समारोप.समारोपाच्या वेळी कवी प्रा.श्री प्रवीण दवणे,ठाणे यांचे

दीपस्तंभ मनातले जनातले या विषयावर ते पाचवे पुष्प गुंफतील

डॉ.अनिल शिंदे प्रमुख अतिथी असतील.अमळनेरकरांसह रसिकांसाठी पर्वणी असणारी शारदीय व्याख्यानमाला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे दररोज सायंकाळी 6.30 वाजता होईल.

या व्याख्यानमालेस उपस्थितीचे आवाहन मराठी वाङ्‌मय मंडळ,

अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ सोमनाथ ब्रह्मे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा.शीला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!