गांधी जयंती निमित्त दाऊदी बोहरा जमात अमळनेर व छत्रपती श्री शिवाजी गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव
2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंती निमित्त दाऊदी बोहरा जमात अमळनेर व छत्रपती श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान श्री शिवाजी गार्डन मध्ये राबविण्यात आले. याप्रसंगी गार्डनमध्ये अस्तावस्त पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या व प्लास्टिकचे रॅपर्स व तंबाखूचे फेकलेल्या पुड्या आदी कचरा गोळा करण्यात आला. पानांच्या कचरा सुद्धा बाजूला लावण्यात आलाव व संपूर्ण साफसफाई करण्यात आली . याप्रसंगी बोहरा समाजाचे प्रेसिडेंट शेख एहसान भाई बुऱ्हानी, सेक्रेटरी शेख मोहम्मद भाई करमपुर वाला शेख मोहम्मद भाई बोहरी,शेख अब्बास भाई,पीआरओ प्रमुख हुनेद भाई कलकत्तावाला, अहमदी भाई, जाहीद भाई, तर छत्रपती श्री शिवाजी गार्डन ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.व नागरिकांनी यात सहभाग नोंदविला.