बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीने स्वत:वरच गोळी झाडून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न…
(विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)
बदलापूर : राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे,असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.आरोपीने पोलिसांच्या बंदुकीने गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
बदलापूर येथे शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.यादरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलीस त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्याची प्रकृती तसंच एका पोलीस कर्चचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे.
सदर प्रकरणामध्ये एन्काऊंटर झाल्याचा संशय जनसामन्यातून व्यक्त केला जात आहे.