शेतकऱ्यांच्या घरात चप्पल बूट घालून जाणारे मंत्री महोदयांचे पुनर्वसन होणार का
अमळनेर : विक्की जाधव.
नुकतीच होऊ घातलेल्या विधानसभा जवळच येत असल्याने जणू मीच पुन्हा होणार आमदार या अविर्भावात राहणाऱ्या गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मैदानी उतरणार असणाऱ्या प्रत्येक भावी आमदाराला आता गोड स्वप्न पडू लागले आहेत. फक्त पैसा हेच समीकरण असून शेतकऱ्यांच्या घरात चप्पल बोट घालून जाणारे मंत्री महोदय अनिल पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाकडे पाठ फिरवली असून आता जनतेची आठवण येणे सुरु झाले आहे.
तसेच गेल्या पाच वर्षात कधी न पोहोचणारे दळवेल गावात मंत्री अनिल पाटील यांनी नुकताच दौरा केला असून सामान्य जनतेच्या शेतकऱ्याच्या घरी कसे जावे याचे मंत्री अनिल पाटील यांना भान नाही कां कां विसर पडला. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण आमदार झालो एवढेच नवे नवे तर आपण मंत्री देखील झालो, त्यांच्याच घरात चप्पल बूट घालून???
गणेशोत्सवानिमित्ताने तालुक्यातील जनता आणि शेतकरी यांच्या घरी मंत्री महोदय चक्क घरात गणपती बाप्पाची स्थापना असताना देखील मंत्री महोदय चप्पल बूट घालून प्रवेश करतात ही शोकांतिका आहे.
असंच जर मंत्री महोदय वागत असतील तर त्यांचे विचार आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
बूट चप्पल घालून शेतकऱ्यांच्या घरात जाणाऱ्या मंत्री महोदय यांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी पुनर्वसन करतील का हा हि प्रश्न आहे.
अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायला होत आहे.