उजनी जलाशयात पंडि आणि वडप च्या सहाय्याने मासाळी मासेमारी परवाना मिळण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांना केली मागणी
(निलेश गायकवाड)
उजनी जलाशयाच्या पंडी आणि वडपच्या सहाय्याने मासाळी मासेमारी परवाना मिळण्यासाठी श्री वर्धनी मत्स्य व्यवसाय सहकारी सोसायटीच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी करण्यात आली.
पारंपरिक मच्छीमार व उजनी जलाशयाच्या शेजारी गावात स्थानिक रहिवासी यांचा वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय मासेमारी आहे. तसेच यामध्ये भूमिहीन असल्यामुळे यांचे उपजीविकेचे साधन केवळ मासेमारी. उजनी धरण तयार होण्यापूर्वी पासून भीमा नदीवर मासेमारी करून उपजीविका केली गेली. त्यानंतर उजनी धरण झाल्यापासून धरणावर वडप आणि पंडित च्या साह्याने मासेमारी केली जाऊ लागली.यामध्ये वड पंडीच्या बंदीच्या साह्याने मासेमारी करण्यासाठी बंधन घातले गेले. हे बंधन यापूर्वी कधीही घातले गेले नव्हते. असे पारंपरिक मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सांगितले व आपली व्यथा व्यक्त केली.
वडप आणि पंडित च्या साह्याने मासळीवर बंदी असल्यामुळे या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.तरी आमदार भरणे यांनी बोलताना सांगितले शासन स्थरावर्ती लवकरात लवकर आपला प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.
तसेच यावेळी निवेदन देताना वर्धनी मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन तलाश परदेशी, सचिव किशोर गजरे तसेच माजी सरपंच सतीश वाघ, नितीन काळंगे गणेश कांबळे,किरण पन्हाळे, भीमराव वाघ आदिजन उपस्थित होते.