June 29, 2025 12:55 pm

नागपुरातील विविध गणेश मंडळांना भेट देवून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले दर्शन

अपनी भाषा में पढ़े! Translate

नागपुरातील विविध गणेश मंडळांना भेट देवून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले दर्शन

मंडळांमध्ये लाडक्या बहिणींचा उत्साह

प्रतिनिधी – रजत डेकाटे

नागपूर, :- राज्यातील गोर-गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांना चिंतामुक्त करुन त्यांच्या उन्नतीचे मार्ग समृद्ध कर अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली. नागपूर येथील विविध गणेश उत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली आबाल वृद्धांशी संवाद साधला.

प्नागपूर येथील प्रियदर्शनी नगर, गेडाम ले-आऊट, त्रिमूर्ती नगर, एल.आय.जी. कॉलनी, लोकसेवा नगर, न्यू सोनेगाव, पॅराडाईज सोसायटी, एच. बी. इस्टेट, भेंन्डे ले-आऊट, कैकाडी नगर, जयताळा, अमल तास लेआऊट, पूजा लेआऊट व विविध श्री गणेश मंडळांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देवून मंडळांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

गणेशोत्सव निमित्त नागपूर महानगरात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत असून विविध गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण जागृतीचे देखावे तयार केले आहेत. शासनाने दिलेल्या कायदा व सुव्यस्थेच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याला मंडळांनी प्राधान्य दिले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!