न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

“राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरासाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील दोन एन. एस. एस. स्वयंसेवकांची निवड”

अपनी भाषा में पढ़े! Translate

“राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरासाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील दोन एन. एस. एस. स्वयंसेवकांची निवड”
इंदापूर प्रतिनिधी भगवान लोंढे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबिर पूर्व निवड चाचणी करीता जिल्हास्तरीय निवडचाचणी शिबीरा मधून कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण ता इंदापूर येथील कु.प्रियंका संतोष चव्हाण आणि स्वप्निल कांतीलाल लोंढे या दोघांची निवड करण्यात आली आहे.

महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) २०२५ , राष्ट्रपती भवन परिसर, नवी दिल्ली परेड पूर्व जिल्हा स्तर निवड चाचणी शिबिर, अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे येथे सहभागी झालेल्या रासेयो स्वयंसेवकांपैकी (दि. ११/०९/२०२४) अनुक्रमे –

१) कु.प्रियंका संतोष चव्हाण-SYBA
२) स्वप्निल कांतीलाल लोंढे – T.Y.B.Sc.
३) वैभव जयंत भोईटे – T.Y.B.Sc.

हे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि स्वयंसेविका सहभागी झाले होते.

यासाठी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे “पुणे ग्रामीण विभागाचे” विभागीय समन्वयक डॉ अनिल बनसोडे यांनी अथक परिश्रम घेतले आहे.
कु.प्रियंका संतोष चव्हाण आणि स्वप्निल कांतीलाल लोंढे या दोघांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!