January 30, 2025 10:53 am

सुरंगली येथे बैल आणि सुरंगली शिवारामधुन दोन गिर गांई ची चोरी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरंगली येथे बैल आणि सुरंगली शिवारामधुन दोन गिर गांई ची चोरी.

भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील ।। भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे शनिवारी रात्री एक वाजेच्यां सुमारास गावातील डी.पी.जवळील शेख.शगीर शेख मुन्सी यांच्या गावजवळील शेतातुन अज्ञात चोरट्यांनी बैल चोरुन नेला . शेख शगीर शे.मुन्सी यांनी सकाळी पाच वाजता शेनपाणी,चारा पाणी करण्यासाठी गेले असता एक बैल गायब असल्याचे दिसून आले. शेख शगीर यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.भोकरदन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन गिर गाई ची चोरी सुरंगली शिवारातील सुरंगली पासुन दिड किमी अंतरावर असलेल्या सुरंगली ते सुरंगली फाटा रोडवरील विठ्ठल सोनवणे यांच्या शेतातील पत्राच्या शेड मधुन विठ्ठल सोनवणे यांच्या दोन गिर गाई अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या .अंदाजे किंमत एक लाख रुपये असल्याचे विठ्ठल सोनवणे यांनी सांगितले. रोज दोन गाई चे सकाळी दहा लिटर आणि रात्री दहा लिटर असे 20 लिटर दुध निघत होते. असे विठ्ठल सोनवणे यांनी सांगितले. एका गाईला तिन महिन्यांचे वासरी कालवड आहे.तर एका गाईला दोन महिन्यांचे गोर्हा असल्याचे सांगितले. विठ्ठल सोनवणे यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून भोकरदन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल भोकरदन पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी गाई नेल्या वासरे नेले नाहीत. वासरे आपल्या आई ची वाट पहात दुधासाठी हंबरडा फोडत आहेत .असे शेतकरी सोनवणे यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलतांना सांगितले.

आपल्या आई ची वाट पहात दुधासाठी हंबरडा फोडणारे वासरे.

चोरी स गेलेला बैल

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!