January 30, 2025 11:03 pm

बारामतीच्या आर.टी.ओ.चा वसुली थरार नियमबाह्य करत केला पाठलाग;भिगवण येथील युवकाची गाडी झाली पलटी लाखोंचे नुकसान

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामतीच्या आर.टी.ओ.चा वसुली थरार नियमबाह्य करत केला पाठलाग;भिगवण येथील युवकाची गाडी झाली पलटी लाखोंचे नुकसान

(निलेश गायकवाड)

#आरटीओचा थरार

जनतेच्या पैशांवर पाळलेले सरकारी गेंडे जेंव्हा लोकांच्याच जीवावर उठतात तेंव्हा उद्रेक होतोच. बारामती आरटीओची ही गाडी एका सामान्य वडाप चालक व्यावसायिकाच्या मागे पाठलाग करत थेट जिल्हाहद्द पार करत कर्जत तालुक्यातील खेड गावातील मराठी शाळा, आठवडे बाजार परिसरातल्या गल्लीबोळात घुसली. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, याप्रसंगी कुणीही आडवे आले असते तरी चिरडले असते.

व्हॅनमध्ये केवळ व्यक्ती घेऊन जाणारा इको व्हॅनचा चालक या साहेबाच्या धाडसाला इतका भेदरला की, या वसुली अधिकाऱ्याच्या भीतीने इको गाडी माणसांना घेऊन अक्षरशः जाग्यावर पलटी झाली. गाडीतील महिलांना दुखापत झाली, कुणाची हाडे मोडली. या गरीब व्यावसायिकाच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले. (या व्यावसायिकाने सीट वाहून केवळ तीनशे रुपये कमावले असते)

चूक लक्षात आल्यानंतर भेदरलेल्या या आरटीओला जमावाने वेढा घातला होता. तिथल्या आया-बहिणींची ती परिस्थिती पाहून अनेकांनी या साहेबाला सुनावले. अनेकजण अंगावर धावून चार-दोन लाथा घालण्याच्या अवस्थेत होते. मात्र नशीब बलवत्तर राशीन पोलिसांनी त्यांना जमावाच्या तावडीतून वाचवले.

गाडीत माणसे बसवली म्हणजे मोठा खुणाचा गुन्हा केला का? तसे असेल तर मग ऑनलाईन दंड करायचा होता ना! गाडीत बॉम्ब किंवा सोन्याच्या पेट्या असतील, असा संशय असेल तर पुढे राशीन पोलिसांना कळवायला हवे होते.

लोकांचा प्रसाद खावा लागेल या भीतीने घाम पुसत या चूकलेल्या महान लोकसेवकाने जखमी रुग्णांच्या दवाखान्याचा निम्मा खर्च देण्याचे कबूल केले. तिथून जखमींना रुग्णालयात तर आरटीओ आणि अपघातग्रस्त वाहनाला राशीन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

विशेष म्हणजे, सगळा कार्यक्रम अंगलट आल्यानंतर या आरटीओने चालकाला कायद्याचा धाक दाखवत त्याकडून स्व:बचावाचा सुंदर ‘जबाब’ लिहून घेतला. खरंच महाराष्ट्रात असे अधिकारी मिळायला जनतेचं खुप मोठं भाग्य लागतं.

या मस्तवाल वसुली आरटीओला प्रशासन पाठीशी घालणार का? सर्वसामान्याला न्याय मिळवून देणार ?

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!