न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अखेर हर्षवर्धन पाटील यांचं ठरलं… 9 तारखेला घेणार निर्णय…

अपनी भाषा में पढ़े! Translate

 अखेर हर्षवर्धन पाटील यांचं ठरलं… 9 तारखेला घेणार निर्णय…

(निलेश गायकवाड)

इंदापूर : प्रचंड राजकीय कोंडीत सापडलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी अखेर येत्या नऊ तारखेला ऐतिहासिक राजकीय निर्णय घेण्याचे निश्चित केल्याची माहिती खात्रीलायक सत्राकडून समजते.

हा निर्णय पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणावर दुरगामी परिणाम ठरणारा असणार असेही बोलले जात आहे. नेहमीच विधानसभेच्या वेळी इंदापूर विधानसभेचे तिकीट कोणाला मिळणार हे जाणून बुजुन अनिश्चिततेच्या उंबरठ्यावर आणून ठेवल्याने या सर्व राजकीय कोंडीत सापडलेल्या सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना नाईलाजाने त्यांना मानणाऱ्या राज्यातील हितचिंतकांच्या व मतदार संघातील कार्यकर्त्याच्या प्रचंड आग्रहाखातर ऐतिहासिक निर्णय घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. हाच निर्णय राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम ठरणारा असेल असेही राजकीय तज्ञाकडून बोलले जात आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणजे सुसंस्कृत व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण राज्यभर परिचित आहेत. त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा राज्याला फायदा होईल असेच राजकीय तज्ञाकडून बोलले जात आहे. त्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पक्षात स्थान दिले गेले पाहिजे असेही अनेक दिवसांपासून राजकीय तज्ञा बरोबरच हितचिंतक व कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांचा सहकार व इतर क्षेत्रांमध्ये असणारा गाढा अभ्यास निश्चितच राज्यासाठी फायद्याचा होणार आहे व पक्षाला देखील फायदा होणार आहे. याच सर्व गोष्टीचा लेखाजोखा येणाऱ्या काळात निश्चितच राज्याला बघायला मिळणार आहे. आणि म्हणूनच हितचिंतक व विधानसभा कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या आग्रहाखातर येत्या नऊ तारखेला हर्षवर्धन पाटील मोठा राजकीय ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक सूत्राकडून समजले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!