June 30, 2025 2:47 pm

भटक्या विमुक्तांचा आधारवड दिपस्तंभ असलेले उपराकार लक्ष्मण माने यांची ग्रेट भेट एक अविस्मरणीय अनुभव – पत्रकार दिनेश मडके

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांची ग्रेट भेट झाली. यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना करमाळाच्यावतीने ‌‌सत्कार करण्यात आला.यावेळी करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश मडके सचिव नरेंद्रसिंह ठाकूर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. उपराकार लक्ष्मण माने यांच्याशी त्यांच्याशी उत्तम संवाद ही साथला गेला भटक्या विमुक्त समाजासाठी केलेली त्यांनी काम एखाद्या चित्रपटाच्या चलचित्रप्रमाणे उभे राहिले . उपराकार म्हणजे खऱ्या अर्थाने संघर्षायाञीच संपूर्ण भारतामधील मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कार्य करणारव्यक्तिमत्व…समाजातील उपेक्षित परिवर्तनवादी व पुरोगामी विचाराना नेहमी आपल्या लेखणीतून त्यांनी वास्तव मांडलं ते 1990 ते 1996 या कालावधीमध्ये विधानपरिषदेचे सदस्य म्हणूनही उत्तम कामकाज केले .
त्यांचे नाव घेताच उपराकार म्हणून त्यांची ओळख आपणा सर्वांना आहेच उपरा तमाम मराठी बांधवांपर्यंत पोहोचलीच परंतु त्याचे अनुवाद हिंदी शिवाय इंग्रजी गुजराती तमिळ फ्रेंच मल्याळम आदी भाषेतून झाले.
‘उपरा’ या आत्मकथनातून लक्ष्मण माने यांच्या जीवनातील संघर्षाची प्रत्येक ठिणगी मानवमुक्तीच्या ध्यासाकडे झेपावताना आपणास दिसते.
भटके खडतर जीवन, नव्या पिढीमधील जीवघेणा संघर्ष, अज्ञान, अपमान, अवहेलना हे पाचवीलाच पूजलेलं. आपल्या शिक्षण घेणाऱ्या मुलाने लग्न करावं म्हणून आई-वडिलांच्या जीवाची झालेली उलघाल . आंतरजातीय विवाह, दोन पिढ्यांमधील संघर्ष, जातपंचायतीचे चटके जिद्द व त्यातून निर्माण झालेली ‘नवविचारांची तिरीप’ हे ‘उपरा’चं फार मोठं सामर्थ्य आहे.
. भटकं-पालावरचं जग माणुसकीच्या शोधात निघते… आणि त्याचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जातो. तरीही न थकता सतत समस्यांच्या भोवऱ्यांतून वाट काढणारा व जीवनाचा अंकुर फुलवणारा हा जीवनपट त्यांनी उपरा या आत्मकथेतून मांडला आहे. जीवन च्च्या प्रयत्नवादाची गाथा उपरांमधून दिसून येतात.समस्यांच्या चक्रव्यूहातून घेतलेली ही झेप निश्चितच आकाशाला गवसणी घाल्णारी असून भावी पिढीला दिशा देणारी आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!