न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान.
प्रतिनिधी -मयूर पाटील

पारोळा-येथे  दिनांक २५/०८/२०२४ रोजी  इमाम बादशहा दर्गावर कोणीतरी अज्ञात इसमाने पिर दर्गा मधील दानपेटी तोडून तसेच मजार असलेली चादर, फुले. अगरबत्ती, दिवे व त्यांचे पवित्र ग्रंथ हे अस्ताव्यस्त फेकुन दिले होते. त्यावरुन पारोळा पो.स्टे. गुरनं २७१- २०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९८, २९९, ३०३(२), ३२४(४) प्रमाणे दि.२५/०८/२०२४ रोजी अज्ञात इसम विरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
पुन्हा सदर गुन्हयाच्या अनुषंगाने दि.२६/०८/२०२४ रोजी सकाळी १२.०० वाजेच्या सुमारास वरील गुन्हयातील अज्ञात इसम हा पिर दर्गा जवळ आल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरुन पारोळा पो.स्टे. पोलीस निरीक्षक सुनिल पवार व त्यांचे पोलीस अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अज्ञात संशयीत आरोपी यास ताब्यात घेतांना मुस्लीम समाज जवळपास १५० ते २०० लोकांनी घेराव केला त्यावरुन पारोळा शहरात जातीय तेढ निर्माण होऊन तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परंतू पोलीस अधिकारी व अंमलदार प्रवीण पाटील यांनी आरोपीस तात्काळ शासकीय वाहनात पोलीस स्टेशनला आणले सदर आरोपी आणतांना १५० ते २०० युवक यांनी गाडीस घेराव घातला होता. आरोपीस पोलीसांनी Outer Quadran करुन त्यास शासकीय वाहनात सुरक्षित बसवुन पो.स्टे.ला आणले. सदर घटना झाल्यावर पारोळा शहरातील मार्केट भागात हिंदू व मुस्लीम समाजाचे दोन्ही गटाचे जवळपास ४०० ते ५०० लोकांचा समुह जमा झाला होतो. परंतु वेळेत प्रवीण पाटील पोलीसांने फोर्स पोहचुन काही मुस्लीम समाजातील व्यक्तींची मदत घेवुन तात्काळ संतप्त जमावास कायदा हातात न घेण्याबाबत आवाहन केल्यानंतर जमाव तेथुन निघुन गेला.
अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर व उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग सुनील नंदवाळकर यांनी पारोळा शहरातील दोन्ही समुहातील नागरीकांना एकत्र बोलावुन त्यांना समाजात एकोपा ठेवा असे आव्हाण केल्यावरुन सर्व समाजातील लोकांनी शांतता ठेवली. ह्या कामगिरीबद्दल अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर व उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग सुनील नंदवाळकर यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांचा मनोबल वाढविण्यासाठी सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे पोलीस निरीक्षक सुनील पवार कॉन्स्टेबल अभिजीत पाटील आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!