न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

बंडू जी गीलोरकर मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्ती समारंभ

अपनी भाषा में पढ़े! Translate

बंडू जी गीलोरकर मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्ती समारंभ

रजत डेकाटे प्रतिनिधी

कुही तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या सिर्सी (नवेगाव) येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडूजी गीलोरकर सेवानिवृत्ती समारंभ सिर्सी (नवेगाव) येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय सिर्सी (नवेगाव) येथील विद्यालयाच्या प्रांगणात समारंभ पार पडला. सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. केवलराम तितरमारे होते. समारंभात बंडूजी गिलोरकर यांचा सहपत्नी सुरेखा गिलोरकर यांचा सुध्दा लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. केवलराम तितरमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ उपस्थित होते. सेवानिवृत्ती हा प्रसंग प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या जीवनात येत असतो. तोच प्रसंग स्व. यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय सिर्सी (नवेगाव) येथे तो घडून आला.

बंडूजी गिलोरकर यांनी ३४ वर्षे स्व. यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात कार्यरत असतांनाचे अनुभव गिलोरकर यांनी त्यांच्या सत्कार समारंभात बोलताना सांगितले. यावेळी ते भारावून गेले होते.
इतकेच नव्हे तर उमरेड येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा इंजिनियर सपना मेश्राम व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रव मेश्राम यांच्या हस्ते सुद्धा बंडूजी गिलोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कुही बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, शिक्षक डि. आर.भोंगडे, शिक्षक आय.डब्लु.तितरमारे, शिक्षक डि.के. वाघमारे, शिक्षिका कु. एस.पी.नंदनवार मॅडम, संस्थेचे संचालक देवराव राघोर्ते, रमेश ऊके,
मुकुंदराव बाभरे, जीवन बान्ते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ खिलोटे, प्रमोद खिलोटे, प्रदिप धनरे,
अमोल गिलोरकर, जयश्री गिलोरकर,शिलवान गजभिये, संजय भोयर, निखिल धानोरकर, गुणवान गजभिये,विजय सहारे,मन्साराम मोरांडे, जगदीश गजभिये,अभिशेख नारनवरे, निखिल धारगावे, तुरका व सिर्सी आणि नवेगाव, धानला या गावातील नागरिकांची सुध्दा यावेळी उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक हेमंत तितरमारे यांनी तर शिक्षक पुडके यांनी आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!