June 29, 2025 11:22 pm

प्रताप महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन..

 

अमळनेर : विक्की जाधव 

● 5 व 6 सप्टेंबर रोजी स्पर्धा ● स्पर्धेचे सलग 9 वे वर्ष

●निःशुल्क प्रवेश●करिअर कौन्सलिंग सेंटरचा उपक्रम

अमळनेर: येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. 5 व 6 सप्टेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2024 होती, त्याप्रमाणे आतापर्यंत या स्पर्धेत राज्यातील 35 महाविद्यालयाने त्यांच्या प्रवेश पत्रिका पाठविलेल्या आहेत. ही स्पर्धा निःशुल्क असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत.गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या आणि महाराष्ट्रात गाजलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्रताप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रतापियन श्री.यशपाल पवार (UPSC),श्री.धनंजय कोळी ( PSI), आणि राजश्री पाटील (पोलीस) यांच्या हस्ते होणार आहे, तर या समारंभाचे अध्यक्ष स्थान प्रताप महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी भूषविणार आहेत. त्यानंतर प्रश्न मंजुषा स्पर्धेची पहिली फेरी दिवसभर होईल, दुसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या दोन फेऱ्या घेऊन समारोप समारंभात या स्पर्धेचा निकाल घोषित करून बक्षीस दिले जाईल.

असे असतील स्पर्धेचे बक्षिसे

प्रथम- रुपये 10000

द्वितीय- रुपये 7000

तृतीय – रुपये 5000

उत्तेजनार्थ पहिले-रुपये 2000

उत्तेजनार्थ दुसरे-रुपये 1000

यासह सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहेत प्रस्तुत समारंभात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *पर्यावरण* या मुख्य संकल्पनेला अनुसरून दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी घेतलेली निबंध लेखन स्पर्धा आणि 15 ऑगस्ट रोजी *स्वातंत्र्य दिनाचे औचित्य* ठेवून करियर कौन्सिलिंग सेंटर यांनी घेतलेली सामान्य बुद्धी मापन स्पर्धा परीक्षा या दोन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण केले जाणार आहे. लग दोन दिवस चालणाऱ्या या पूज्य सानेगुरुजी प्रश्नमंजुषा स्पर्धेला खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल आणि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे चिटणीस डॉ.अरुण.बी.जैन,सह सचिव डॉ.धिरज वैष्णव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रस्तुत दोन दिवसीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन करिअर कौन्सलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, स्पर्धेच्या संयोजिका प्रा.वृषाली वाकडे यांच्यासह सर्व आयोजन समितीने केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!