पुनर्वसनमंत्र्यांच्या तालुक्यात आपत्तीचे व्यवस्थापन करणार कोण? सात्री गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर तालुक्याचे सात्री गावाचे 100% पुनर्वसन झाले असुन सुद्धा आद्यप स्थलांतर का झालेले नाही.
गावाच्या विकासासाठी सूडबुद्धीचे राजकारण करून झारीचा शुक्राचार्य कोण? वर्षानुवर्ष सात्री गावच्या ग्रामस्थ्यांची दिशाभूल करून आपली राजकीय पोळी भरणाऱ्यांना सात्रीकर करणार कां माफ
बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या सात्री गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न शासन स्तरावर लवकरात लवकर मार्गी लागावा. अशी मागणी सात्री गावचे ग्रामस्थांनी केली आहे बऱ्याचदा पावसाळ्यात पूर आल्यास गावाचा संपर्क तुटतो अनेक समस्या निर्माण होतात परंतु यां पुरातून प्रवास करावा लागतो. सात्री गावच्या ग्रामस्थांच्या मुला-मुलींच्या जीवास धोका निर्माण होतो मात्र गावाचे पुनर्वसन झाल्यानंतरही सदर गावाचे स्थलांतरण का थांबले आहे हा मोठा प्रश्न आहे.
काही दिवसापूर्वी घरांचे सर्वेक्षण देखील झाले आहेत तसेच जर गाव स्थलांतरित झाले नाही तर नदीच्या पाण्याचा पुरामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रखडलेल्या स्थलांतरामुळेच सात्री गावाची खूप मोठी बिकट परिस्थिती झाली आहे सात्री गाव हे स्थलांतराचे दोन क्रमांकाचे गाव आहे चोपडा तालुक्यातील धूपी हे तीन नंबर गाव असताना देखील या गावचे संपूर्ण स्थलांतर झालेले आहे.
अमळनेर तालुक्याचे आमदार मंत्री अनिल पाटील पुनर्वसन खात्याचे मंत्री असून देखील तालुक्यातील गावांचा प्रश्न सुटत नसेल तर ‘ लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत असे सात्री गावचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले.
डांगर गाव देखील पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत..
निम्न तापी पाटबंधाऱ्याच्यां पुनर्वसनात डांगर गावच्या देखील प्रश्न देखील तितकाच गहान आहे तो मार्गी लागण्या साठी ग्रामस्थ्यांचे शासन दरवर्षी खेळफाटा माराव्या लागत आहेत.
गेल्या दहा वर्षापासून प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप स्थलांतर झालेले नाही शासनाकडून याबाबत बँकेत धनादेश सुपूर्द करण्यात आला असुन देखील प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असे ग्रामस्थांनी सांगितले.