शेतकरी त्रस्त मंत्री मस्त तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान मंत्री अनिल पाटील यांच्यामुळेचं : शेतकऱ्यांनी केला आरोप.
अमळनेर : विक्की जाधव.
संपूर्ण महाराष्ट्रभरात पावसाने थैमान घातले असुन सर्वत्र ओला दुष्काळ झाला आहे शासन स्तरावर या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसून अमळनेर तालुक्यात याचे पडसाद उमटले आहेत. नुकतीच शेतकरी संघटनेने अमळनेर तहसीलदारांना निवेदन दिले आहे. अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून ओला दुष्काळाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणे संधर्भात तालुक्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे गंभीर अडचणीत सापडले आहेत. शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत, पण शासन कडून अजूनही कोणतीही ठोस मदत शेतकरी बांधवांना मिळालेली नाही.
विशेष म्हणजे, शेजारच्या तालुक्यांना मागील दुष्काळ अनुदान मिळाले असताना, अमळनेर तालुका मात्र या मदतीपासून वंचित राहिला होता.
दोन वर्षांपूर्वीच्या अतिवृष्टीचे ५४ कोटी रुपये अजूनही पुनर्वसन खात्यात पडलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. असा शेतकऱ्यांचा आरोप आहे की, “पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या दुर्लक्षामुळे अमळनेर तालुक्याचे १५० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या संदर्भात शासन स्तरावरून ओल्या दुष्काळाची गंभीरता लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केली जात आहे.
“राजकारणात मालामाल होणारे मंत्री आणि बेहाल होणारे शेतकरी, हेच आजच्या वास्तवाचे हें विदारक चित्र आहे. असे रोखठोक शब्दात शेतकऱ्यांनी सांगितले.