देशात ‘हा’ आजार घालतोय धुमाकूळ; WHO ने दिला इशारा..
(विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण)
दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये चांदीपुरा व्हायरस वेगाने पसरत आहे. गेल्या 20 वर्षांत भारतात हा धोकादायक आजार झपाट्याने वाढल्याचे WHO ने मान्य केले आहे. अशातच आता त्याचा मृत्यूदर हा 33 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
चांदीपुरा विषाणूचा पुढील प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वेक्टर नियंत्रण आणि माश्या, डास आणि टिक्स यांच्या चाव्यापासून बचाव करण्याची शिफारस केली आहे.
पाऊस पडल्यानंतर डास आणि माश्यांमुळे रोगराईचा धोका वाढतो. त्यामुळे चांदीपुरा व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे. तसेच या आजाराचे वेळीच निदान केले नाही तर मृतांची संख्या देखील वाढू शकते. हा रोग मुख्यतः 15 वर्षांपेक्षा लहान मुलांना होत आहे. या आजारामध्ये ताप येणे हे मुख्य कारण आहे.