30 दिवसांच्या आत चोरटा आणी चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात. दौंड पोलिसांची दबंग कारवाई.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – दिनांक ०१/०८/२०२४ रोजी
दौंड पोलीस स्टेशन येथे सौ. वैशाली वाघमोडे रा. भवानीनगर ता. दौंड जि. पुणे यांचे घरात चोरी झाली असा गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता सदर चोरी मध्ये सोन्याचे गंठण, सोन्याचे राणीहार, सोन्याची चैन, कानातील सोन्याचे दागीने, मोहनमाळ, नेकलेस व सोन्यी अंगठी असे एकुण अंदाजे १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने किंमत अंदाजे रुपये ७, २०,०००/- असा मुददेमाल घरफोडी करुन चोरी गेले बाबत दौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके सो यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी केला यामधे आरोपी चैतन्य संजय शिंदे वय २२ वर्षे रा. यवत दोरगेवाडी ता. दौंड जि. पुणे यास १९/०८/२०२४ रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने ०७ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलाआहे चोरी ला गेलेले एकुण १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने किंमत रुपये ७,२०,०००/- असा मुददेमाल चोरट्या कडुन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख साो, मा. अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे साो पुणे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप सो दौंड विभाग दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके सो, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पो.हवा/एस.डी. राउत, पो. हवा/नितीन बोराडे, सहा. पोलीस फौजदार/पांडुरंग थोरात, पो. हवा निखील जाधव, पो. हवा अमिर शेख, पो. हवा पांढरे, पो. कॉ संजय कोठावळे, पो. कॉ पवन माने, यांनी केली आहे.