शेतातून घरी येत असताना अंगावर विज पडुन मायलेकी चां अंत सिसार खेडा येथील घटना
भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील । परवा रविवारी वारी दुपारी तीन वाजता पाऊस सुरु झाल्या मुळे शेतातुन घरी परतत असतानाच अंगावर विज पडून आई आणि मुलीचा दुर्दैवाने अंत झाला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . सदरील घटना संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भराडी जवळील सिसार खेडा या गावात घडली.याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार सिसार खेडा येथील सौ.रेणुका हरीदास राऊत, स्वाती हरीदास राऊत ह्या मायलेकी शेतात कामासाठी गेल्या होत्या सुमारे तिनं वाजेच्या दरम्यान पाऊस सुरु झाल्या मुळे त्या घरी येण्यासाठी निघालेल्या असतांनाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.आणि विज पडुन मायलेकी चां दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.