June 30, 2025 11:29 pm

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय;काका-पुतण्यांच्या संघर्षात अखेर काकांनीच बाजी मारली

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय;काका-पुतण्यांच्या संघर्षात अखेर काकांनीच बाजी मारली

(निलेश गायकवाड)

राज्यासह देशाचंही लक्ष लागून राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांच्या संघर्षात अखेर काकांनीच बाजी मारली आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत.
बारामतीमध्ये शरद पवार पॉवरफुल असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला आहे.देशातील सर्वात हायव्होल्टेज आणि लक्ष लागून असलेल्या बारामती मतदार संघ शरद पवार यांनी कायम राखला आहे. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे.

राष्ट्रवादी पक्ष फुटल्यावर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्यात लढत होणार अशी चर्चा झाली. काही दिवसातच सुनेत्रा पवार यांना तिकीटही जाहीर झालं.

बारामती मतदारसंघात दोन्ही परिवारांनी जोरदार ताकद लावलेली दिसली. सुप्रिया सुळे यांनी अखेर विजय मिळवला आहे. संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुक जिंकली आहे.
बारामती मतदारसंघात दोन्ही परिवारांनी जोरदार ताकद लावलेली दिसली. सुप्रिया सुळे यांनी अखेर विजय मिळवला आहे. संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुक जिंकली आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक लाखपेक्षाा जास्त मतांनी सुनेत्र पवार यांचा पराभव केला आहे. मागील निवडणुकीमध्येही सुप्रिया सुळेंनी एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता.

दरम्यान, अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लढवलेल्या पाच जागांमध्ये फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!