कर्मयोगीचा गावंगाव स्वच्छ, सुंदर व समृद्ध  करण्याचा संकल्प..

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्मयोगीचा गावंगाव स्वच्छ, सुंदर व समृद्ध  करण्याचा संकल्प..

कर्मयोगी नागपूर जिल्ह्यातील नागपूर, हिंगणा तालुक्यातील ग्रामीण भागात आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्त्वानुसार मोठ्या प्रमाणात आपले सामाजिक कार्य राबवित आहे.

जवळपास २१७ गावात कर्मयोगी फाऊंडेशनचस कार्यविस्तार झाला आहे. कर्मयोगीने आता अशी व्यवस्था उभारायचा  संकल्प  केला आहे की ग्रामीण भागात कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पाहिजे,  कोणत्याही गरीब मुलीचे शिक्षण व लग्न थांबले नाही पाहिजे. कोणताही माणूस  पैशाच्या अभावामुळे मरण पावला  नाही पाहिजे अशी व्यवस्था  उभारत गाव स्वच्छ सुंदर व समृद्ध करण्याचा संकल्प घेतला आहे.

या संकल्पाची सुरवात कर्मयोगीने नागपूर तालुक्यातील आलागोंदी येथे १ जून  रोजी सकाळी ६ ते ८ या वेळेत श्रमदान करत आपलं  गाव सर्वप्रथम स्वच्छ सुंदर व समृद्ध  करण्याचा संदेश कृतीतून दिला. या श्रमदानात ग्रामपंचायत आलागोंदी सदस्य, गावकरी मंडळी व कर्मयोगी परिवारातील सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!