आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्यावर ऍट्रॉसिटी दाखल करा, व शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृती चे धडे देणार्या सरकारवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी मनुस्मृती दहण कार्यक्रमात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान करून समस्त आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर ऍट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत असे निवेदन दौंड पोलीस स्टेशनचे पीआय डोके साहेब यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले, तसेच मनुस्मृती सारख्या विषारी पुस्तकातील धडे शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आणून, शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये जातिभेद पेरण्याचा मोठा डाव शासनाचा आहे त्यामुळे शासनाचा देखील जाहीर निषेध या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आला यावेळी, तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, ता. सचिव अजिंक्य गायकवाड, शहराध्यक्ष सैफभाई मण्यार, शहर उपाध्यक्ष टोनी भाई जगताप, शहर सचिव निलेश मिसाळ, लिंगाळी गण उपाध्यक्ष शुभम वानखेडे, शहर कार्यकारिणीचे इब्राहिम भाई शेख, विकी पवार, आप्पासाहेब वाघमारे इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.