June 29, 2025 5:04 am

मुंदडा ग्लोबल स्कुल चे वर्चस्व कायम कु. वैभवी शशिकांत गोसावी 97.80% मिळवुन तालुक्यात प्रथम..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुंदडा ग्लोबल स्कुल चे वर्चस्व कायम कु. वैभवी शशिकांत गोसावी 97.80% मिळवुन तालुक्यात प्रथम.


.

अमळनेर : विक्की जाधव..

मुंदडा फाउंडेशन संचलित श्री एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील निकालाची परंपरा कायम ठेवून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

कु.वैभवी शशिकांत गोसावी ही विद्यार्थिनी 97.80% मिळवून तालुक्यात प्रथम आली असुन तसेच युतीका संजीव पाटील 97% मिळवून द्वितीय तर कु. अनोखी प्रवल गुरव 96.40% मिळवून तृतीय, शृंगस्था पवार 95.20% मिळवून चौथी, तर निर्मल कुमार पाटील व यज्ञेश पाटील हे 95 टक्के गुण मिळवून पाचवे आले आहेत.

या परीक्षेत 51 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. सायन्स या विषयात कु. युतीका पाटील या विद्यार्थिनीस 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन सौ. छायाभाभी मुंदडा, सचिव श्री अमेय मुंदडा, सहसचिव श्री योगेश मुंदडा, श्री नरेंद्र मुंदडा, श्री राकेश मुंदडा, श्री पंकज मुंदडा, ऍडमिनिस्टर सौ. दीपिका मुंदडा, सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य श्री लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्य सौ. विद्या मॅडम, प्री प्रायमरी कॉर्डिनेटर सौ. योजना टक्कर, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!