नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी दौंड नगरपरिषदेतर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड: बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करावे, यासाठी जनजागृती करण्यासाठी मुख्य अधिकारी विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड नगरपरिषदेतर्फे जुनी नगरपरिषद इमारत,हुतात्मा चौक,दौंड येथे दिनांक 3 मे रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रांगोळी स्पर्धेत एकूण 25 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धा लहान आणि मोठा अशा दोन गटात झाली.
मोठा गट
प्रथम क्रमांक – सारिका मंगेश गोलांडे.
द्वितीय क्रमांक – सुनिल लालासो नेटके.
तृतीय क्रमांक – नेहा माणिक कांबळे
लहान गट
प्रथम क्रमांक- मुक्ता संदीप कुलथे.
द्वितीय क्रमांक- वैभव प्रभू रोडगे, तृतीय क्रमांक – कृष्णा मंगेश गोलांडे
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जनकल्याण शहर स्तर संघाच्या ज्योती मोकळ, कौसर सय्यद, सुरैय्या शेख, सोनाली शिंदे, रेखा सवाणे आणि दौंड नगरपरिषदेचे अधिकारी हनुमंत गुंड, तृप्ती साळुंखे, दीपक म्हस्के, शुभम चौकटे,विजय नरड, गणेश ओहोळ यांनी प्रयत्न केले.