करमाळा प्रतिनिधी :- लोकसभेच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार दौरा करमाळा तालुक्यात झंझावाती पद्धतीने सुरु असून मोहिते पाटील परिवाराकडून गावभेट दौऱ्याचे योग्य नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शीतलदेवी मोहिते पाटील यांनी आवर्जून महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक व न्याय मंत्री स्व. दिगंबररावजी बागल यांच्या समाधीचे मांगी येथे दर्शन घेतले. विशेष म्हणजे सध्या बागल कुटुंबीय हे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करत आहेत. स्व. बागल यांच्या कन्या रश्मी बागल व पुत्र दिग्विजय बागल यांनी मागील महिन्यात भाजपा मध्ये प्रवेश केलेला असल्याने त्यांना पक्षादेशानुसार महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणे क्रमप्राप्त आहे.
परंतु मोहिते पाटील परिवाराने Election व Relation यामध्ये अंतर पडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेत राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवत स्व. बागल यांच्याशी असलेले वैयक्तिक नाते या निमित्ताने आणखी दृढ असल्याचे संकेत दिले. यावेळी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी मामांसोबत अनेक प्रसंगाना उजाळा देत बागल यांच्या समाधीला अभिवादन केले
यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख देवानंद बागल, तरटगावचे माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे, अमरजीत साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.