ग्रामीण भागात गावठी दारूच्या हातभट्टीवर अमळनेर पोलिसांची मोठी कार्यवाही..
तर शहरात कोणतीच कार्यवाही नाही जण सामान्यांन कडून प्रश्न होत आहेत उपस्थित.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक विकास देवरे हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , प्रशांत पाटील ,सागर साळुंखे यांनी जानवे येथील नाना बुधा पारधी वय ६० ही व्यक्ती गावठी दारू विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्याच्याजवळील ८ हजार रुपये किमतीची दारू पोलिसांनी नष्ट केली.
तर शहराच्या विविध भागातही गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून यावर वचक ठेवणारे कोणीही नाही का?? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या या हातभट्टीच्या दारूचे भले मोठे दुष्परिणाम असून अमळनेर शहरात ही दारू सर्रास विकली जात आहे.
तसेच त्यांना जानवे येथील तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात दारू भट्टया सुरू असल्याची माहिती ही मिळताच त्याठिकाणी धाड टाकली असता तेथील आरोपी पळून गेला.