June 29, 2025 5:16 pm

सिर्सी ग्रामपंचायत “राम” भरोसे काय ?

अपनी भाषा में पढ़े! Translate

सिर्सी ग्रामपंचायत “राम” भरोसे काय ?
सरपंच – उपसरपंच प्रचारात व्यस्त, नागरीक मात्र त्रस्त

सिर्सी:- गावातील वार्ड क्र ४ चे पिण्याच्या पाणी टाकी दुरुस्ती चे काम २२ फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कमिटी ने घेतला.उन्हाळा सुरू होतांना पाण्याचे टाकी चे काम सुरू करूम त्या पाण्याच्या टाकी वर अवलंबून असलेल्या वार्ड क्र ४ व ५ मधील नागरिकांसाठी पर्यारी पाण्याची व्यवथा म्हणून टँकर ने पाणी देण्याचा निर्णय ग्रामपंचायत कमिटी ने केला. त्यात टँकेर ठेकेदार स्वतःचे बिल वाढवायला मन मर्जी प्रमाणे पाणी टँकर वाटप करतांना नजरेस येताच. दिवसाला ८ टँकर पाणी देण्याच्या निर्णय ग्रामपंचायत कमिठी मध्ये करण्यात आला.
पाणीटाकी दुरुस्ती कधी पूर्ण होईल आणि नळाला केव्हा पाणी येईल या प्रतीक्षेत नागरीक उन्हाळयात पाण्याची वाट पहात आहे. पाणी प्रश्नावर नागरीक चिडून असेल असता. ग्रामपंचायत मधिल एका सदस्या चा पाणी टँकर घोटाळा वरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणत वाईरल होतंय.त्या ग्रामपंचायत सदस्य यांनी सरपंच यांच्यावर केलेले आरोप किती खरे आहे आणि किती खोटं हे मात्र निष्पक्ष चौकशी केल्यास टँकर घोटाळ्यातील दोषी नागरिकांसमोर समोर येईल.
ग्रामपंचायत कमिटी सद्यस सध्या निवडणुकी मुळे नेत्यांचा प्रचारात त्यांची व्हा व्हा करण्यात आणि समोरची राजकीय वाटचीस नेत्यांचा आशीर्वाद असावा म्हणून सर्व नेते प्रचारात व्यस्त आहे. नागरीक मात्र प्रचंड संतापून ग्रामपंचायत नेते वार्डात प्रचार करायला आल्यास नेत्यांना जोड्यानी मारणाच्या भूमिकेत दिसून येत आहे.
वार्ड क्रं ४ मधील ग्रामपंचायत सध्यस यांना विचारणा करण्यात आली असता “मला वार्डातील टाकीच्या कामा बद्धल पूर्वसूचना नाही आणि काहीही माहिती नाही ” असे सांगण्यात आले.
ग्रामपंचायत सचिव यांचा सविस्तर माहिती विचारली असता त्यांनी ” मी स्वतः ग्रामपंचायत सरपंच व कमिटी यांच्या पासून त्रासलो आहे.यांचा वादामुळे सिर्सी चा विकास रखडत जातय ” असे सांगण्यात आले. सरपंच व उपसरपंच यांच्या कडे प्रतिक्रिया मागायला संपर्क साधला असता घरो – घरी टँकर ची व्यवस्ता करून देऊ अशी प्रतिक्रिया देण्यात आली.
इकडे टँकर पाणी वाटप मुळे गावात जावा- जावत, सासू – सुनेचे झगडे होऊन पोलिस स्टेशन पर्यंत गेले. ग्रामपंचायत टँकर चालक पण नागरीकांसोबत अरे रावी ची भाषा बोलत नागरिकांना दम देतो. टँकर पाणी वाटप ठेकेदार व टाकी दुरुस्ती ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करून लायसन ब्लॅक लिस्ट करावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होतं आहे. टाकी दुरुस्ती ठेकेदार , टँकर ठेकेदार व सरपंच यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी सीर्सी येथिल समस्त नागरीक करीत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!