न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात विशेष लघुरुद्र महापूजा

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात विशेष लघुरुद्र महापूजा

अमळनेर :येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त १० एप्रिल रोजी विशेष लघुरुद्र महापूजा करण्यात आली. मंदिरात स्वामी समर्थ महाराजांची अलौकिक प्रतिमा स्थापन केलेल्या स्थळी रांगोळ्यांसह विशेष आकर्षक सजावट करून हा उत्सव साजरा झाला.

महापूजेचे मानकरी तासखेडा (ता. अमळनेर) येथील जिजाबराव दिलमर पाटील हे सपत्नीक होते. त्यांच्या शुभ हस्ते गणपती पूजन, पुण्याह वाचन होऊन स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांवर लघुरुद्र महापूजा करण्यात आली. पुरोहित सारंग पाठक, व्यंकटेश कडवे, साहिल जोशी, मिलिंद उपासनी, ऋषिकेश कुलकर्णी, शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. या महापूजेनंतर स्वामींची विशेष महाआरती होऊन महापूजेची सांगता झाली. त्यानंतर मंदिरात पाटील दाम्पत्याच्या हस्ते सायंकाळची श्री मंगळग्रह देवतेची महाआरती करण्यात आली.

यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांच्यासह मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!