अमळनेर खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाची निवड बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत धर्मदाय उपआयुक्त यांनी तीन महिन्यांच्या आत निरीक्षकांनी नव्याने निवडणूक
प्रक्रिया राबवण्याचे आदेश ४ एप्रिल रोजी दिले आहेत.
अमळनेर : विक्की जाधव..
नवीन संचालक मंडळ निवडून येईपर्यंत विद्यमान संचालक मंडळ तात्पुरता म्हणून काम पाहतील पण कोणतेही अधिकारीक आदेश देता येणार नाही असेही आदेशात म्हटले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
२०२२ ते २५ या कार्यकाळासाठी नवीन संचालक मंडळ निवडून आले होते. या नवीन संचालक मंडळाने चेंज रिपोर्ट सादर केला होता. १६ डिसेंबर २०१८ ला सर्वसाधारण सभेने निवडणुकीबाबत काही नियम बनवले होते. आणि सर्वसाधारण सभेला
संस्थेचे सर्वोच्च अधिकार आहेत. २०१८ पासूनचे संचालक मंडळच कायदेशीर असल्याने
निवडणूक कोणी घ्यावी असा प्रश्न निर्माण होतो म्हणून धर्मदाय उपआयुक्त एम. डी. गाडे यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकांनी तीन
महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विद्यमान संचालक मंडळ तात्पुरता अधिकार म्हणून काम पाहताना आर्थिक आणि
धोरणात्मक निर्णय घेताना पूर्वपरवानगी शिवाय काहीच करणार नाही असेही आदेशात म्हटले आहे.