June 29, 2025 9:41 am

धोबी समाजाच्या बैठकीत ईशारा : …तर लोकसभेच्या निवडणूकांवर बहिष्कार !

अपनी भाषा में पढ़े! Translate

धोबी समाजाच्या बैठकीत ईशारा :

…तर लोकसभेच्या निवडणूकांवर बहिष्कार !

अमरावती – राज्यातील परीट धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचे लाभ मिळावेत या गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित प्रश्नावर ठोस भूमिका घ्या,समाजाच्या सार्वजनिक बैठकीत आम्हाला विश्वास द्या अन्यथा राज्यातील 30 लाख परीट (धोबी) समाज येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेपासून लांब राहून निवडणूकवर बहिष्कार राहील अशा ईशारा सकल धोबी समाजाच्या बैठकीतून घेण्यात आला.

अमरावती येथील कटोरा नाका येथील संत गाडगेबाबा सभागृहात राज्यातील मराठी व समाविष्ट सर्व उपजातींच्या धोबी समाजाच्या राज्यातील सकल पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज शुक्रवारी (5 एप्रिल) आयोजित करण्यात आली होती.बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील ज्येष्ठ उद्योजक राजेंद्रशेठ आहेर हे होते. बैठकीचे संयोजक राजाभाऊ उंबरकर, अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, ज्येष्ठ नेते मुकुंदराव पालटकर, किसनराव जोर्वेकर,माजी प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे,आरक्षण लढ्याचे अभ्यासक अनिल शिंदे, मधुकरराव आहेर,जग्गनाथ फाले,प्रा.रमेश सांबस्कर,सनाथ वढई,विश्वनाथ राऊत, रामसूमेर बुंदेले,विमलताई खंडाळे, वैशालीताई केळझरकर, संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ वडूरकर, सुभाषराव टाले,सुकदेव शेंडे,हरीश म्हस्के, उषाताई फाले, वैशालीताई राऊत,कल्पना गायकवाड,अरुण धोबी, सौ. मनीषाताई ठाकरे प्रा.डॉ.अरुण पेढेकर आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

सकल धोबी समाजाच्या आरक्षणासाठी न्यायलयाचा दरवाजा ठोटावणार

राज्यातील परीट -धोबी समाज नव्याने आरक्षणाची मागणी करीत नसून धोबी जातीला देशातील सतरा राज्यात आणि पाच केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जातीत समाविष्ट आहे. राज्य शासनाकडे 2002 पासून सादर राज्यपाल नियुक्त डॉ.भांडे समितीचा अहवालाच्या शिफारसीप्रमाणे 1960 पूर्वी राज्यात धोबी जातीला असलेल्या आरक्षण व सवलती पूर्ववत लागू करण्याची आमची मागणी आहे.या मागणीसाठी सकल समाजाच्या वतीने महाराष्ट्रासाठी उच्च न्यायलयात आणि इतर राज्य सोबत येत असल्यास सर्वोच्च न्यायलयात जनहीत याचिका दाखल करून न्यायलायचा दरवाजा ठोटावून न्यायिक लढा उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

न्यायिक लढ्यासाठी सुकाणू समितीची स्थापना –
राज्यातील धोबी समाजाच्या न्यायिक लढ्यासाठी 21 जणांची राज्यस्तरीय कोअर
कमिटी स्थापन झाली.विशेष म्हणजे या कोअर कमिटीत कुणीही अध्यक्ष किंवा प्रमुख म्हणून न नेमता सर्वांना सारखे अधिकार असलेले राज्यातील धोबी समाजाचे प्रतिनिधी मंडळ म्हणून या समितीला मान्यता देण्यात आली.समितीमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ उद्योजक राजेंद्रशेठ आहेर (नाशिक)तर समितीत सकल महाराष्ट्र धोबी समाजाचे प्रतिनिधी म्हणून मुकुंदराव पालटकर (नागपूर),
एकनाथराव बोरसे (धुळे), किसनराव जोर्वेकर (चाळीसगाव),अनिल शिंदे (अकोला),सनत वढई (गोंदिया), राजेंद्र उंबरकर (अमरावती), विवेक ठाकरे (जळगाव), रामसूमेर बुंदेले (अमरावती),
प्रा. सदाशिव ठाकरे (धुळे), विश्वनाथ राऊत (वाशीम),
वैशालीताई केळझरकर (यवतमाळ), प्रा.डॉ.पी.आर. रोकडे (संभाजीनगर),प्रा. डॉ. अरुण पेंढणेकर (अमरावती), प्रा.शेख अस्लम शेख मुज्जफर (नंदुरबार),राज छोटेलाल परदेशी (पुणे), विश्वनाथ मुके (चंद्रपूर) यांचा समावेश असून
महाराष्ट्र सकल परीट (धोबी) समाज आरक्षण न्यायिक सुकाणू समिती म्हणून समितीला न्यायालयीन लढ्याचे अधिकार राहतील. समितीला तुषार रंधे (धुळे), मधुकर तेलंगे (पुणे), सोनल शिंदे (धुळे), सुरेश बुंदेले (अकोला), किशोर किनकड (वर्धा), शांतारामभाऊ कदम (रायगड),संतोष वाल्हे (नंदुरबार) प्रकाश कंडारकर (अकोला), अँड. जगदीश कुंवर (नंदुरबार),अँड. विजय शिरले (अकोला), योगेश किल्लेदार,
अँड. दिनेश चहाकार (अकोला) आदी समाजातील वकील हे कायम निमंत्रित सदस्य म्हणून राहतील असा बैठकीत सर्वानुमते ठराव करण्यात आला असता उपस्थित समाज बंधु -भगिनींनी त्याला अनुमोदन दिले.
जिल्हास्तरावर कृती समिती – महाराष्ट्र सकल परीट (धोबी) समाज आरक्षण न्यायिक सुकाणू समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यावार एक ज्येष्ठ, एक युवक व एक महिला समाज प्रतिनिधी नियुक्त करण्याचे व न्यायलयीन लढा बळकट करण्यासाठी राज्य कृती समिती कार्यरत राहणार आहे.यामध्ये
प्रा. रमेश सांबास्कर (वाशीम),
सुभाष टाले (अकोला), प्रशांत बेडीस्कर (ठाणे), अमृत कुंवर (धुळे), रमेश बोधनकर (वर्धा), वैशालीताई राऊत (पुणे), सुषमा अमृतकर (अमरावती), सीमाताई रंधे (धुळे), लोटन धोबी (नंदुरबार), अरुण धोबी (शिरपूर), अलकाताई मधुकर आहेर (नाशिक ),ईश्वर मोरे (जळगाव), राजाराम कनोजिया (मुंबई), विनायक यादव (सांगली),अशोक शिंदे (सांगली ),लक्ष्मणराव निकम (नगर), सुनील दळवी (नगर), प्रकाश जाधव (सातारा), भिकू राक्षे (सातारा), गणेश मढीकर (संभाजीनगर), अनिल हुपळीकर (पुणे), मोहन राऊत (बीड), शंकर परदेशी (अकोला),
प्रदीप उंबरकर (अमरावती),
राजकुमार बोंदरकर (अमरावती),गजानन वानखेडे (अमरावती), राजेंद्र हिवाळे (नाशिक),अजबराव मोकळकर (अकोला), नारायण शिंदे (नांदेड),सचिन शहाकर (अकोला), हरीश म्हस्के, दादाराव बाभुळकर (कारंजा लाड), मीनाताई कवडे (अकोला), संजय नांदे (आर्वी),
सुभाषराव सोनवणे (मूर्तिजापूर),
अशोक सपके (औरंगाबाद)

 

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!