पंचाक्षरी मंत्र : आनंद दिघे
आनंद दिघे या पंचाक्षरी मंत्राने दोन दशकंहून अधिक काळ ठाण्यासह महाराष्ट्र व शिवसेनेला मंत्रमुग्ध केले होते. अवघ्या ४९ वर्षांच्या आयुष्यात या अवलिया महापुरूषाने असंख्य लोकांच्या आयुष्यात वसंत फुलविला. असंख्य लोकांना नोकरी व स्वयंरोजगार मिळवून दिला.त्यांच्या न्यायालयात आलेल्याला वाडा मोखाडा पालघर जव्हार सारख्या दुर्गम भागातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. स्वत: एका फकिरासारखे जगले परंतू असंख्य कार्यकर्त्यांचे जीवन फुलवले व समृद्ध केले. असंख्य जोडप्यांची लग्न लावून दिले प्रसंगी कन्यादानही केले मात्र स्वत: अविवाहित राहून शिवसेनेस वाहून घेतले. त्यांना पितृत्व लाभले नाही परंतू त्यांनी शिवसैनिकांवर पित्यासारखे प्रेम केले. प्रसंगी पित्याचा धाकही दाखवला. असंख्य भगिनींचे चे भाऊ होते, निराधारांचे आधारस्तंभ होते, साधु संतांचे ते आश्रयदाते होते. ते नाथ पंथिय होते, त्यांचे व्यक्तिमत्व गूढ होते. त्यांच्यात प्रचंड अशी अध्यात्मिक शक्ति होती.
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे दैवत होते.त्यांचा आदेश प्रत्यक्षात आणणे हा त्यांचा धर्म होता. देव, देश व धर्म रक्षण करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय्य होते. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा ते मान राखत. त्यांना शिवसैनिक व चाहत्यांचा आग्रह कधीच मोडवत नसे. काळ वेळाचे बंधन झुगारत व स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून ते आपल्या चाहत्यांचा मान राखण्यासाठी धाऊन जात असत.
आनंद आश्रम हे आधारतीर्थ होते. पवित्र तिर्थक्षेत्र होते. देवस्थानातही वेळेचे बंधन असते. परंतू आनंद आश्रम हे २४ × ७ कार्यरत असे. निवांत बोलायचे असेल तर रात्री २ वाजता ये, असे ते मला सांगत. असे
हे समाजमन जपणारं, समाजसेवेचे अग्नीहोत्र २२ वर्षापुर्वी निमालं. आपल्या चाहत्याच्या आग्रहाखातर मध्यरात्री ते गणेश दर्शनासाठा जीपने निघाले व एका बसने त्यांच्या जीपला धडक दिली . त्यात त्यांचा पाय जायबंदी झाला. त्यांचे ह्रदय आधीच कमकुवत झाले होते. आणि उपचारा दरम्यान ह्रदय विकाराचा झटका आला आणि आमचा आनंद हिरावला गेला. संतप्त चाहत्यांनी सिंघानियाची होळी केली. दिघे साहेबांचे पार्थिव पोलीसांच्या देखरेखीखाली रूग्णालयाच्याखाली स्टाफने आणले व तेथुन टेंभी नाक्यावर अंतिम दर्शनासाठी ठेवले. त्यावेळी सतत वाज असलेली हे राम हे राम, जगमे है साचो नाम ! ही धुन आजही कानात घुमत आहे. याचे अनेक साक्षिदार आजही हयात आहेत. परंतू दिघे साहेबांचा परिस स्पर्श होऊन रिक्षा ड्रायव्हरचा अब्जोपती झालेला गद्दार जो स्वत:ला दिघे साहेबांचा स्वयंघोषित पट्टशिष्य म्हणवतो, त्याने दिघे साहेबांच्या अपघाती मृत्यूचे राजकिय भांडवल करण्याचा केलेला प्रयत्न गिधाडांनाही लाजवणारा आहे.काय तर म्हणे त्याने शिष्य पौर्णिमा केली , काय तर म्हणे सिंघानिया जळत असताना त्या दाढीने स्वत:च्या खांद्यावरून दिघे साहेबांचे पार्थिव आणले ? नंतर नंतर तर कहरच केला. तब्बल २१ वर्षा नंतर या गद्दाराला साक्षात्कार झाला की दिघे साहेबांचा मृत्यू हा घातपाताने झाला ! त्यानंतर त्याचा तो टिनपाट आमदारही त्याचीच रि ओढू लागला. दिघे साहेब, तुमच्या आनंद वनात अशी विषवल्ली पोसली गेली व ती आत्ता बांडगुळाचा धर्म निभावत आहेत.
साहेब, या गद्दारांना तुमच्या दैवी व आध्यात्मिक शक्तिने अद्दल घडवा ! त्यांना तुमच्या शब्दांत हासडा- काय रे दाढी तुला सोन्याची ×× फुटलीत का ?
साहेब, तुमचा सहवास २६ वर्षे लाभला, हे मा़झे अहो भाग्य आहे.
आनंद मरा नही, आनंद मरते नही, आनंद हरेक निष्ठावंत के रूपमें सदियो तक जिंदा रहता है ! तुमचा पवित्र आनंद आश्रम या बाटग्यांनी बळकावला, जिथे शिवसेनेची विजयी मुहूर्तमेढ रोवण्याच्या योजना आखल्या जात होत्या तिथे शिवसेनेसाठी कबर खोदण्याची कट कारस्थानं शिजवली जात आहेत. आनंद आश्रमच्या दर्शनी भागावरील आपले अस्तित्व हेतू पुरस्सरपणे हहनष्ट केले गेले आहे, इतकेच नाही तर ठाण्यातील टप-या व स्टाॅलवरील तुमचे फोटो जाऊन गद्दार दाढीचे फोटो झळकत आहेत.
जसे दाढी वाढवून आनंद दिघे होता येत नाही तसे टप-यावरील तुमचे फोटो का्ढून स्वत:चे फोटो लावून आनंद दिघे होता येणार नाही. आनंद दिघेंची पक्ष निष्ठा, नेतृत्वावरील निष्ठा, निस्वार्थ वृत्ती, कर्तव्यपरायणता, जनमानसातील प्रतिमा कुठून आणणार हे गद्दार ? दिघे साहेब तुम्ही कुठेही असाल परंतू या गद्दारांना क्षमा करू नका ! या गद्दारांना गाडून टाका ! आपले कार्य मी निष्ठेने सुरू ठेवले आहे, त्यास यश लाभण्यासाठी आशीर्वाद द्या ! यांचा नायनाट झाल्याखेरीज तुमच्या आत्म्याला शांती लाभणार नाही, हे मला चांगले ठाऊक आहे. आजच्या ७२ व्या जयंती दिनी विनम्र अभिवादन !
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०