अमळनेरात गणरायाच्या विसर्जनात अमळनेरकरांचा संयमाचा जलवा; प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत बाप्पाला निरोप

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260926-WA0264

अमळनेरात गणरायाच्या विसर्जनात अमळनेरकरांचा संयमाचा जलवा; प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत बाप्पाला निरोप

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

भक्ती, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत अमळनेर शहरातील गणेशोत्सव यंदा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत संयमाची भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य केले. संत सखाराम महाराज माऊली मित्र मंडळ, पवनपुत्र गणेशोत्सव मंडळ भोईवाडा, जय बजरंग मंडळ पान खिडकी यांसह शहरातील विविध मंडळांनी उत्साह कायम ठेवत शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन मिरवणुका पार पाडल्या.

गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनासह अमळनेर नगरपरिषद आणि महावितरण विभागानेही आवश्यक सहकार्य केले. शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळांशी समन्वय साधत प्रशासनाने उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न केले. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नियमांचे पालन केले. त्यामुळे उत्सवाचा उत्साह आणि प्रशासनाची शिस्त यांचा सुरेख मेळ पाहायला मिळाला.

यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही अनुचित घटनेला वाव न देता शांततेत पार पडल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या कालावधीत अमळनेर शहरात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे भक्ती, संयम, कायद्याचे पालन आणि प्रशासनाला सहकार्य या चौकटीत पार पडलेला यंदाचा गणेशोत्सव शहराच्या सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवून गेला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!